सोमवार, २४ ऑक्टोबर, २०११

कधी......कधी?

ना जीवनी झालो सफल कधी
ना दोहा न झालो रुबाई कधी
आरंभ करण्या उठलो जरासा
कळलेच नाही अंत आला कधी
 
वैशाख वाटेत आला कधी
कांटेच पायात रुतले कधी
कैफात कसल्या बेहोश होतो
पाठीत खंजीर घुसला कधी
 
आरोह अवरोह घ्यावे कधी
सूर-ताल लय-ताल सारे कधी
भवताल सारा जर शुष्क ऐसा
मग सांग तो मल्हार यावा कधी
-अशोक
 
(अतुल मिश्रा यांच्या एका कविते वरून सुचलेली)
.
अतुल मिश्रांच्या कवितेची लिंक
http://www.starnewsagency.in/2009/11/blog-post_9277.html

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा