मनात.....
मनात हिरवळ टिकून असली की
गाणारे पक्षी नक्कीच येतात
आयुष्यातल्या ग्रीष्माला
श्रावण-तान देवून जातात
मनात मूल लपून असलं की
बालगाणी तोंडपाठ होतात
आंब्याच्या झाडालाही मग
बारमाही कै-या लागतात !!
मनात कविता दडून असली की
ओसाडातही फुलं फ़ुलतात
कधी, कुठे, केंव्हाही
क्षितीजावर इंद्रधनु दिसतात !
-अशोक
मनात हिरवळ टिकून असली की
गाणारे पक्षी नक्कीच येतात
आयुष्यातल्या ग्रीष्माला
श्रावण-तान देवून जातात
मनात मूल लपून असलं की
बालगाणी तोंडपाठ होतात
आंब्याच्या झाडालाही मग
बारमाही कै-या लागतात !!
मनात कविता दडून असली की
ओसाडातही फुलं फ़ुलतात
कधी, कुठे, केंव्हाही
क्षितीजावर इंद्रधनु दिसतात !
-अशोक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा